AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पंजाब कृषी विद्यापीठाकडून पेरणी यंत्राची निर्मिती !
शेतीतील नवा शोध!Agrostar
पंजाब कृषी विद्यापीठाकडून पेरणी यंत्राची निर्मिती !
➡️या अत्याधुनिक पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या भातपिक अवशेषांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागू शकेल. या यंत्रात सुपर सिडर आणि हॅप्पी सिडर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने होशियारपूर स्टीलसोबत नुकतेच एक सहकार्य करार केला आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने एक अत्याधुनिक असे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र विकसित केले आहे. या पेरणी यंत्रासंदर्भात विद्यापीठाने जालंधर येथील होशियारपूर स्टीलसोबत हा सहकार्य करार केला आहे. ➡️पंजाब कृषी विद्यापीठाने होशियारपूर स्टीलसोबत नुकतेच एक सहकार्य करार केला आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने एक अत्याधुनिक असे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र विकसित केले आहे. या पेरणी यंत्रासंदर्भात विद्यापीठाने जालंधर येथील होशियारपूर स्टीलसोबत हा सहकार्य करार केला आहे.पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजमेर सिंग धाट, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाते डॉ.अशोक कुमार, विद्यापीठाच्या कृषी यांत्रिकीकरण आणि जैवऊर्जा विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. गुरुसाहिब सिंग मानेस यांनी या संशोधनाबद्दल डॉ. राजेश गोयल, डॉ. मनप्रीत सिंग यांचे अभिनंदन केले आहे. ➡️या अत्याधुनिक पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या भातपिक अवशेषांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागू शकेल. या यंत्रात सुपर सिडर आणि हॅप्पी सिडर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना अवशेषांचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल, असा विश्वास विद्यापीठाच्या कृषी सयंत्रे आणि ऊर्जा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. महेश कुमार नारंग यांनी व्यक्त केला आहे. ➡️ट्रॅक्टरच्या मदतीने वापरण्यात येणाऱ्या या पेरणी यंत्राद्वारे बियाणे जमिनीत अचूक ठिकाणी सोडणे सहजशक्य होणार आहे. ४५ ते ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे या यंत्राचा वापर करता येतो. एका तासाला ०.४ हेक्टर जमीन पेरण्याची आणि एका लिटर इंधनात ५ एकर जमीन पेरण्याची या यंत्राची क्षमता आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
1