AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पंचगव्याचे पिकांमधील कार्य
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पंचगव्याचे पिकांमधील कार्य
• पिकांची वाढ व रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पंचगव्या हे महत्वाचे कार्य करते. • पंचगव्यामध्ये बऱ्याच पोषक घटकांचा समावेश आहे. उदा. नत्र, स्फुरद, पालाश. • सूक्ष्म पोषक घटक वनस्पतींच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असून यामध्ये अमीनो ऍसिड, जीवनसत्त्वे, ऑक्सिन्स, जीब्रेरलीनसारख्या विकास नियंत्रक, सुडोमोनस, अॅझटोबॅक्टर आणि फॉस्फर बॅक्टेरिया इत्यादीसारख्या फायदेशीर सूक्ष्मजीव देखील आहेत.
घटक -प्रमाण • गाईचे शेण - ५ किलो • गोमुत्र - ३ लिटर • गाईचे दुध ¬- २ लिटर • दही - २ लिटर • गावरान तूप - १ लिटर • ऊसाचा रस - ३ लिटर • नारळाचे पाणी - ३ लिटर • केळी - १ डझन पंचगव्या तयार करण्याच्या पद्धती: • प्रथम शेण, गावरान तूप गोमुत्रामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावे. • हे 3 दिवसांसाठी एका विस्तृत भांड्यात ठेवून त्यात उर्वरित घटक मिसळून घ्यावे. • हे घटक भांडे उघडे सावलीत ठेवून व्यवस्थित हाताने मिसळून घ्यावे. सकाळी व संध्याकाळी काठीने हलवून घ्यावे. • १० दिवसांत पंचगव्या तयार होईल. जर आपण दररोज हाताने किंवा लाकडाच्या काठीने मिश्रण केले, तर ते एक महिन्यासाठी चांगले राहील.
648
0