AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नोव्हेंबर अखेर खात्यात येणार पैसे!
कृषी वार्ताAgrostar
नोव्हेंबर अखेर खात्यात येणार पैसे!
➡️PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्त्याच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. सध्या 12 वा हप्ता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा 12 वा हप्ता जमा केला आहे. मात्र दोन आठवडे उलटून गेले तरी अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. ➡️हि समस्या सोडवण्यासाठी तुम्ही अधिकृत ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधू शकता. ➡️तुम्ही तुमची हप्त्याची स्थिती स्वतः देखील तपासू शकता. 👉🏻यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान www.pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. इथे गेल्यावर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल. 👉🏻त्यावर क्लिक करा आणि Beneficial Status हा पर्याय निवडा. 👉🏻त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि Get Data वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती कळेल. 👉🏻जर पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही टोल फ्री हेल्पलाइनचीही मदत घेऊ शकता. ➡️मंत्रालयाशी संपर्क कसा साधायचा. 👉🏻पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266 👉🏻पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक- 155261 👉🏻पीएम किसान लँडलाइन नंबर- ०११-२३३८१०९२, २३३८२४०१ 👉🏻पीएम किसानची नवीन हेल्पलाइन- ०११-२४३००६०६ 👉🏻पीएम किसान दुसरी हेल्पलाइन- ०१२०-६०२५१०९ 👉🏻ई-मेल आयडी- pmkisan-ict@gov.in ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
7
इतर लेख