AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नुकसान भरपाईत मोठी वाढ !
योजना व अनुदानAgrostar
नुकसान भरपाईत मोठी वाढ !
👉🏻जर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशू किंवा मनुष्याची जीवितहानी झाल्यास कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जाते. मागे शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली होती. मात्र आता रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. 👉🏻नविन निर्णयानुसार मदतीची रक्कम : 1) हल्ला झालेल्या माणसासाठी रक्कम- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास - २० लाख व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास - ५ लाख व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास - सव्वा लाख रुपये 2) हल्ला झालेल्या पाळीव प्राण्यासाठी रक्कम : १)गाय, म्हैस व बैल मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम. २) मेंढी, बकरी व इतर पशुधनांचा मृत्यू झाल्यास बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम. ३) गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजार भाव किमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार देण्यात येतील. 👉🏻अश्या प्रकारे मिळणार रक्कम : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास रुपये २० लाख पैकी २० लाख रुपये देय असलेल्या व्यक्तीला तत्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम जमा करण्यात येईल. 👉🏻रुपये दहा लाखांपैकी रुपये पाच लाख पाच वर्षांकरिता ठेव रकमेमध्ये तर उर्वरित रुपये पाच लाख १० वर्षांकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल. तसेच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. मात्र खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास रकमेची मर्यादा रुपये २० हजार प्रती व्यक्ती देण्यात येणार आहे. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
1
इतर लेख