AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनPrabhudeva GR & sheti yojana
नुकसान ग्रस्त कुक्कुटपालकांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार..🐤
⏩ बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत. 👉 यात प्रामुख्याने ८ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी. 👉 ८ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी. 👉 ६ आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी. 👉 ६ आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु ७०/- प्रति पक्षी. 👉 कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे. 👉 कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम. 👉 ६ आठवडे वयापर्यंतचे बदक रू. ३५/- प्रति पक्षी आणि 👉 ६ आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी, अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचं सुनील केदार यांनी सांगितलं. अधिक माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
1
इतर लेख