क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानAgrowone Marathi
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना
➡️ अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार, विधवा, परित्यक्ता आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही अभिनव योजना राबविली जात आहे. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ➡️ अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार, विधवा, परित्यक्ता आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही अभिनव योजना राबविली जात आहे. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ➡️ पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याची वेळ या महिलांवर आली. पण नांगरणी, वखरणी, व्ही पास, पंजी व पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून अशा विवंचनेत या महिला असतात. नेमकी ही बाब राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लक्षात येताच अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही योजना आखण्यात आली. ➡️ राज्यमंत्री कडू यांच्या आई इंदिरा कडू यांच्या वाढदिवशी या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेची नोंदणी अचलपूर विधानसभा मतदारसंघात सुरू झाली होती व अजूनही सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १०० एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून देण्यात आली आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी मतदारसंघातील ही कामे पूर्ण करून त्या महिला व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आधारवडाची भूमिका पार पाडण्याचा मानस बच्चू कडू यांनी बोलताना व्यक्त केला. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
3
संबंधित लेख