AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नियोजन हळद लागवडीचे!
गुरु ज्ञानAgroStar
नियोजन हळद लागवडीचे!
🌱हळद लागवड करत असताना पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय कर्ब मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली जमीन निवडावी. तसेच या पिकाच्या लागवडीसाठी कोरडे वातावरण पोषक राहते. हळद पिकाची लागवड करत असताना सुधारित जातींचा वापर करणे खूप गरजेचे आहे. सेलम, राजापुरी, कृष्णा, टेकूरपेटा, वायगाव, फुले स्वरूपा यांसारख्या जातींचा वापर करावा. हळद पिकाची लागवड 15 एप्रिल पासून 05 जून पर्यंत पाण्याच्या उपलब्धतेनुसार करू शकतो. 🌱लागवड पद्धती - - सरी वरंबा पद्धत - हळद पिकामध्ये पाट पाणी पद्धतीने सिंचन करायचे असेल तर लागवडीची ही पद्धत वापरली जाते. यामध्ये लागवडीचे अंतर 75*90 सेंमी ठेवले जाते. - रुंद वरंबा (उंच गादीवाफा) पद्धत - ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास या पद्धतीने हळदीची लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. गादीवाफ्याची रुंदी 1 मीटर आणि उंची 20 ते 25 सेमी असावी. तसेच लागवडीचे अंतर 30*30 सेमी ठेवावे. 🌱कंद निवड आणि बेणे प्रक्रिया - - एकर हळद लागवडीसाठी 8 ते 10 क्विंटल बियाणे लागते. लागवडीसाठी अंगठे गड्डे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादन अधिक मिळते. जेठे गड्डे 50 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सशक्त, रसरशीत तसेच नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडेसे कोंब आलेले असावेत. - हळद पिकाच्या निरोगी जोमदार वाढीसाठी लागवडीपूर्वी कंद प्रक्रिया करणे गरजेचे असते. यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि विद्राव्य खत पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात निवडलेले गड्डे 15 ते 20 मिनिटे बुडवावेत. नंतर बेणे सावलीत सुकवावे आणि त्यानंतर त्याची लागवड करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0
इतर लेख