AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नियोजन कलिंगड लागवडीचे!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
नियोजन कलिंगड लागवडीचे!
➡️वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या कलिंगडांची मागणी असते म्हणून या गोष्टीचा प्रथम विचार करूनच वाण निवडावा ज्याद्वारे विक्रीव्यवस्था सोपी होऊन अपेक्षित नफा मिळेल. ➡️कलिंगड पिकास उष्ण व कोरडे हवामान तसेच भरपूर सूर्यप्रकाश पोषक असतो. वेलींची वाढ होण्याकरिता 24 ते 27 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान 18 अंश सेल्सिअस च्या खाली व 32 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. 21 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात बियांची उगवण होत नाही तसेच अति दमट वातावरणात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. ➡️कलिंगडाच्या उत्पादनासाठी मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन योग्य असते आणि जमिनीचा सामू 5.5 ते 7 योग्य असतो. ➡️उन्हाळ्यात जास्तीची मागणी असल्याने कलिंगड लागवड ऑक्टोबर ते मार्च यादरम्यान मोठ्या प्रमाणात केली जाते. थंडीचे प्रमाण जास्त असताना शक्यतो रोपे तयार करून पुनर्लागवड हा पर्याय निवडावा आणि जानेवारी नंतर लागवड करावयाची असल्यास थेट बियाणे टोबून लावण करावी. नर्सरी मधील रोपे दोन पानांवर (18 ते 20 दिवस वयाची) असताना शेतामध्ये पुनर्लागवड करावी लागते. ➡️थेट बियाणे लागवड करताना निदान 200 रोपे तरी ट्रेमध्ये तयार करावीत जेणेकरून उगवण न झालेल्या म्हणजेच नांगे पडलेल्या ठिकाणी रोपे वापरून एकरी वेलींची संख्या निर्धारित ठेवता येईल. ➡️लागवड शक्यतो मल्चिंग पेपर आणि ड्रिप आधारित करावी जेणेकरून पिक पोषणा सोबत पिक संरक्षण सोपे होईल. मल्चिंग मुळे पाणी बचत होऊन तणनियंत्रित राहण्यास मदत होईल. 25 ते 30 मायक्रॉन जाडीचा आणि गरजेनुसार 3 ते 4 फुट रुंदीचा मल्चिंग पेपर वापरावा. ➡️एक एकर क्षेत्रासाठी 300 ते 350 ग्रॅम बियाणे पुरेसे आहे ज्यामध्ये कमीत कमी 6000 वेल येतील यासाठी अंतर दोन ओळींमधील अंतर 4 ते 6 फुट आणि दोन वेलींमधील अंतर 1.5 ते 2 फुट राखावे. लागवडीपुर्वी जमिनीची मशागत चांगली करून घ्यावी जेणेकरून माती भुसभुशीत होऊन मल्चिंग पेपर फाटणार नाही सोबतच जमिनीचा मगदूर सुधारण्यास मदत होईल. ➡️लागवडीच्या वेळी बेड तयार करताना शेणखत, निंबोळी पेंड, सेंद्रिय खते आणि त्यामध्ये एसएसपी 200 किलो, पोटॅश 100 किलो, गंधक 3 किलो, भुमिका 4 किलो व युपीएल झेबा 5 किलो वापरावे. त्यानंतर ठिबकद्वारे विद्राव्य खते वेळोवेळी देणे जरुरीचे आहे. ➡️बियाणे उगवून आल्यानंतर अथवा सुरुवातीच्या काळातील मूळकूज, कीड नियंत्रणासाठी आणि सफेद मुळींच्या विकासासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक आणि ह्युमिक ची रिंगण पद्धतीने आळवणी करावी तसेच आंतरप्रवाही बुरशीनाशक ठिबक मधून सोडावे. ➡️रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी पिकात पिवळे व निळे चिकट सापळे प्रत्येकी पाच लावावे. ➡️अश्या पद्धतीने कलिंगड पिकाची सुरुवातीचे लागवड नियोजन केले तर नक्कीच गुणवत्तापूर्ण उत्पादनात फायदा होईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख