AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
निम्म्यापेक्षा कमी खर्चात बसवा सौरपंप!
योजना व अनुदानAgrostar
निम्म्यापेक्षा कमी खर्चात बसवा सौरपंप!
➡️पिकांना योग्य वेळी पाणी न दिल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या नफ्यावरही होतो. शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी सरकारने अनेक पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत.यापैकी एक पर्याय पीएम कुसुम योजनेच्या रूपाने समोर आला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौरपंप दिले जातात. ➡️60 टक्के अनुदानावर सौर पंप :- प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदानावर सौर पंप पुरवते. शेतकऱ्यांबरोबरच हे पंप पंचायती आणि सहकारी संस्थांनाही समान अनुदानित किमतीत दिले जातात. याशिवाय, त्यांच्या शेताच्या आसपास सौर पंप प्लँट उभारण्यासाठी सरकार खर्चाच्या 30 टक्के कर्ज देते. त्यानुसार या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम खर्च करायची आहे. ➡️शेतकरीही वीज निर्मिती करू शकतात सोलर प्लांट बसवून शेतकरी वीज निर्मिती करू शकतात. विभाग 3 रुपये 7 पैसे दराने उत्पादित वीज खरेदी करेल. यानुसार शेतकरी घरी बसून वार्षिक ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात.pmkusum.mnre.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी अनुदानावर हा सौरपंप मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. ➡️संदर्भ: AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
12
इतर लेख