AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीखेती की पाठशाला
निमॅटोड/सूत्रकृमीचे जैविक नियंत्रण
• जैविक नियंत्रणासाठी सुडोमोनास फ्लुओरेनसेन्स १.००% डब्ल्यूपी, ट्रायकोडर्मा हरजनीयम/विरीडी १.० डब्ल्यूपी व्हर्टिसिलिअम क्लेमॅडोस्पोरियम १% डब्ल्यूपी या मित्र बुरशीचा वापर महत्वपूर्ण आहे.
या बुरशीची शेतीमध्ये वापरण्याची पद्धत:- • बीजप्रक्रिया:- या बुरशीचा उपयोग बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी केला जातो. २० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रियेसाठी वापरले जाते. • रोपवाटिका - नर्सरीमध्ये बनविलेल्या गादीवाफ्यामध्ये ही बुरशी ५० ग्रॅम/चौ.मी पाण्यामध्ये मिसळून किंवा धुरळून देऊ शकता. जमिनीत वापर - शेतीमध्ये ही बुरशी २ टन शेणखतात २ किलो मिसळून प्रति एकरी देऊन नांगरणी करावी. संदर्भ:- खेती की पाठशाला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ पाहा. लाइक आणि शेअर करण्यास विसरू नका!
95
1