AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
निमकोटेड युरियाचे फायदे अनेक!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निमकोटेड युरियाचे फायदे अनेक!
• पिकांना युरिया खत वापरल्यानंतर त्यातील बराचसा नत्र लिचींग व्दारे वाया जातो. • यासाठी केंद्रशासनाने मे २०१५ पासून देशात उत्पादित होणारा यूरिया व डिसेंबर २०१५ पासून आयातीत यूरिया, सर्व उत्पादक, पुरवठादार यांना निम कोटींग करुनच पुरवठा विक्री करण्याचे बंधनकारक केले आहे. • निम कोटींग युरियाच्या वापरामुळे ५-१० टक्के युरिया खताची बचत होणार आहे. • निम विलोपीत युरियामुळे युरियाखतातील नत्रचे रुपांतर नायट्रेट मध्ये होण्याची प्रक्रिया मंदावते. • त्यामुळे पिकाची नत्र वापराची कार्यक्षमता वाढते. • निम मधील असलेल्या अंगभूत कीटक नाशक गुणधार्मामुळे जमिनीत असणारे निमॅटोड, वाळवी इत्यादी पिकांच्या शत्रूंचे नियंत्रण होते. • युरिया खताची मात्रा कमी प्रमाणात लागत असल्यामुळे शेतक-याच्या खर्चात बचत होते. • यूरिया खतातील नत्रचे वाहून जाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याचे प्रदुषण कमी होण्यास मदत होते. • पिकाची नत्र वापराची कार्यक्षमता वाढल्यामुळे उत्पन्नात देखील वाढ होते. • राज्यात प्रतिवर्षी सरासरी ६५ ते ७० लाख मे.टन खताचा वापर होतो. • यामध्ये युरियाचा वापर सरासरी २५ लाख मे.टन आहे. • यूरिया खत हे नत्रयुक्त खताचा प्रमुख स्त्रोत आहे व नत्राची मात्रा देण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. • यूरिया खताचा वापर प्रामुख्याने पिकाची पेरणी झाल्यानंतर नत्र खताचा मात्रा देण्यासाठी केला जातो. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
6