सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निंबोळी पेंड वापराचे महत्व आणि फायदे जाणून घ्या.
• सेंद्रिय शेतीमध्ये निसर्गत: उपलब्ध असणा-या संसाधनांचा वापर करुन पिकांचे सरंक्षण आणि पीक पोषण केले जाते.
• वनस्पतीजन्य संसाधनमध्ये कडूनिंबाच्या झाडापासून मिळणा-या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर सेंद्रिय शेतीमध्ये होतो.
• यात ही कडूनिंबाच्या बियांपासून तयार होणारी निंबोळी पेंड मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वापरली जाते.
• मे-जून महिन्यात परिपक्व झालेल्या शुध्द निंबोळी गोळा करुन व्यवस्थित वाळविले जातात. त्यापासुन कोल्ड प्रेस्ड पध्दतीने निंबोळी पेंड तयार केली जाते.
• एक्पेलरमधून तेल न काढता तयार होणारी निंबोळी पेंड जास्त फ़ायदेशीर असते. यात निंबोळी मधील अॅझाडीरेक्टिन, निम्बीन, सलानिन हे घटक १०० ते १००० पिपिएमपर्यंत तसेच सिलिका १५% सह इतर उपयोगी तत्व आलेले असतात. यात ५ ते ७ टक्के तेल असते. त्यामुळे कीटकनाशक गुणधर्मासह इतर अन्नद्रव्ये शेतात मिसळले जातात.
• तसेच यात नत्र ३- ५%, स्फ़ुरद १% पालाश २% या प्रमाणात असून पिकांच्या मुळांना हळुहळू उपलब्ध होतो. कडूनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये गेल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात. या पद्धतीमुळे जमीनीतील वावरणा-या किडींचे तसेच पिकांवरील रसशोषक किडींचे देखील नियंत्रण होते. जमिनीमध्ये वास्तव्य करणा-या हानिकारक किडी जसे मुळे कुरतडणा-या अळ्य़ा, हुमणी यांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. तसेच भाजीपाला पिकांवर डाळींब पिकाच्या मुळांवर गाठी करणा-या हानिकारक सुत्रकृमींचादेखील बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. पिकांमध्ये निंबोळी पेंड वापरल्यानंतर ३ ते ६ आठवड्यात त्याचे फ़ायदे दिसू लागतात. निंबोळी पेंडमधील घटक जमिनीत हळूहळू काम करत असल्यामुळे सहा महिन्यांपर्यंत याचा परिणाम दिसून येतो.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.