AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हायरल जुगाडलोकमत
ना नांगर, ना ट्रॅक्टर चक्क बाईकने नांगरणी केली,व्हिडिओ पाहुन थक्क व्हाल!
➡️भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देश कितीही प्रगत झाला असला तरी देशातील बहुतेक लोक आजही शेतीतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत. शेती म्हटलं की नांगरणी आली आणि नांगरणीसाठी लागतात ते बैल किंवा ट्रॅक्टर. पण काही हे दोन्ही उपलब्ध नसेल तर काय? खरंतर काहीच फरक पडणार नाही. कारण बैल आणि ट्रॅक्टरशिवायही नांगरणी करता येऊ शकते. तेसुद्धा बाईकने. ➡️एका तरुणाने चक्क आपल्या बाईकने नांगरणी करून दाखवली आहे. शेतात बाईक घेऊन नांगरणी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. शेतीसाठी केलेला हा देसी जुगाड सर्वांना आवडला आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
7