AgroStar
नाशिकमधून दीड लाख टन द्राक्ष निर्यात
कृषि वार्तासकाळ
नाशिकमधून दीड लाख टन द्राक्ष निर्यात
नाशिक – नाशिक जिल्हयातील द्राक्ष हंगाम संपला असून, यंदा या द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली आहे. ९ मे पर्यंत १ लाख ४६ हजार ११३ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. यापैकी युरोपीय देशात ११ लाख ६४७ टन, तर इतर देशांमध्ये ३४ हजार ४६६ टन दाक्षांची निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीपैकी नाशिक जिल्हयाचा ९१% वाटा आहे.
या जिल्हयामध्ये द्राक्षाचे एकूण ५८ हजार ३६७.४३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात निफाडमध्ये २१ हजार ९४१ हेक्टर, दिंडोरीत १५ हजार ७५८.९३ हेक्टर, नाशिक तालुक्यात ११ हजार ६७१ हेक्टर तर चांदवडमध्ये ५ हजार १४८ क्षेत्रावर लागवड आहे. यापैकी यंदा निर्यातीसाठी २४ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष नोंदणी करण्यात आली. या अंतर्गत ग्रेपनेट प्रणालीमध्ये ३८ हजार ४७८ द्राक्ष प्लॉटची नोंदणी करण्यात आली होती. जिल्हयात द्राक्ष लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६०% क्षेत्रातील पिकाची आधीच निर्यातीसाठी नोंदणी झाली. नाशिकची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, मलेशिया, जर्मनी आदि देशात ही द्राक्षे पाठविली जातात. द्राक्ष निर्यातीच्या आजवरच्या इतिहासात या हंगामातील ही सर्वाधिक निर्यात ठरली आहे. तब्बल १ लाख ४६ हजार ११३ मेट्रिक टन इतकी विक्रमी द्राक्षे परदेशात गेली आहे. संदर्भ – सकाळ, १३ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
34
0
इतर लेख