AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नाबार्ड पुढील 2 वर्षात 5000 शेतकरी उत्पादक संस्था प्रवर्तित करणार.
कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
नाबार्ड पुढील 2 वर्षात 5000 शेतकरी उत्पादक संस्था प्रवर्तित करणार.
शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाशी सुसंगत असलेल्या शेतकरी उत्पादक संस्था (FPO) प्रवर्तित करण्याच्या नाबार्डच्या पुढाकाराचे कौतुक करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विकास बॅंकांची शिखर बँक पुढील 2 वर्षात 5000 एफपीओ तयार करण्याचा टप्पा गाठेल असा आशावाद व्यक्त केला. स्थापन दिवसाच्या 37 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘एकत्रीकरण आणि बाजारपेठेशी दुवे: शेतकरी उत्पादक संघटना’ या विषयावरील परिषदेमध्ये जेटली म्हणाले की नाबार्डचे काम आणि तिचा भारतीय शेतीवरील प्रभाव प्रचंड आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे बोलताना, जेटलींनी कृषी उत्पादनांचा हमी भाव वाढवण्याचा सरकारचा हल्ली घेण्यात आलेला निर्णय स्पष्ट केला. त्यांनी असा सल्ला दिला की कृषी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी केंद्रीय आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन संघीय रचना तयार करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. मंत्री म्हणाले की जेव्हा छोटे आणि अल्प भूधारक शेतकरी गट म्हणून एकत्र येतात तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावरील अर्थव्यवस्थेचा फायदा मिळतो.
एकूण भूधारकांपैकी जास्त प्रमाणातील लोक छोटे आणि अल्प भूधारक आहेत. असंघटीत असल्यामुळे, ते आपल्या उत्पादनासाठी अपेक्षित मूल्य मिळवू शकत नाहीत. त्यांना एफपीओमध्ये संघटीत केल्यामुळे त्यांना निविष्ठा खरेदी करताना आणि उत्पादनांची प्रक्रिया आणि विपणन करताना मोठ्या प्रमाणावरील अर्थव्यवस्थेचा फायदा होईल. संदर्भ - द इकॉनॉमिक टाईम्स 12 जुलै 18
23
0