AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
नागअळीचे जीवनचक्र
आर्थिक महत्व:- अंड्यातून बाहेर पडणारी बाल्यावस्थेतील अळी पिकावर सर्वाधिक परिणाम करते. पान व खोडाच्या पृष्ठभागाखाली प्रवेश करून आतील हरितलवक खायला सुरूवात करतात. नागअळी ही कीड वांगी, शिमला मिरची, बटाटे, काकडी अशा अनेक पिकात आढळून येते._x000D_ जीवनचक्र_x000D_ अंडी अवस्था:- मादी कीड १३ दिवसांच्या आत पानांच्या उतींमध्ये १६० पर्यंत अंडे देते. ही अंडी २ ते ३ दिवसांच्या आत उबतात._x000D_ अळी अवस्था:- नागअळी आतील हरितद्रव्ये खात असल्याने, पानांवर पांढरे नागमोडी आकाराचे पारदर्शक पट्टे दिसतात._x000D_ कोषावस्था:- नागअळी २ ते २० दिवसांच्या आत मातीमध्ये कोषावस्थेत परिवर्तित होते._x000D_ प्रौढ/पतंग: - नागअळीची पतंग अवस्था ६ ते २२ दिवसांनंतर कोषावस्थेतून बाहेर येते. पतंग पिवळ्या रंगाचे असून त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. याच्या वर्षात अनेक पिढी होतात._x000D_ नियंत्रण: - डायमिथोएट ३० ईसी @ २६४ मिली ३०० लिटर पाण्यातून किंवा ऑक्सिडेमेटन - मिथाइल २५% ईसी @१२०० मिली ३०० लिटर पाण्यातुन किंवा नीम आधारित कीटकनाशक १ ईसी @२ मिली प्रति लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ टीप:- औषधांचे प्रमाण वेगवेगळ्या पिकांनुसार बदलते._x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
63
0