कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
नांदेड जिल्ह्यात बावीस कोटींचा विमा ३९ हजार शेतकऱ्यांना मंजूर!
➡️ पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील उत्पन्न आधारित नुकसान झालेल्या ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९७ लाख ५१ हजार रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यापूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणीपश्‍चात नुकसान झालेल्या ८२ हजार ३३३ शेतकऱ्यांना ७५ कोटी ८४ लाखाचा विमा मिळाला होता. यामुळे जिल्ह्यात एकूण एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना ९७ लाख ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार रुपयांचा विमा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. ➡️ जिल्ह्यात मागील वर्षी खरीप हंगामात विमा योजनेत ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद व मूग या पिकासाठी एकूण नऊ लाख ५५ हजार आठशे शेतकऱ्यांनी ४४ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा हप्ता इफको टोकियो विमा कंपनीकडे भरला होता. दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या नुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेतकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. ➡️ काढणीपश्‍चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९ शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती. उत्पन्न आधारित विमा नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी किनवट तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आली. त्यामुळे किनवट तसेच लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाई मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ६१३ कोटींवर प्रीमिअम जमा:- ➡️ खरीप हंगाम २०२० मध्ये पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सहा पिकांसाठी ४४ हजार ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा विमा हप्ता भरला होता. राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१३ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१७ असा एकूण ६१३ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमिअम जमा झाला होता. यातून जिल्ह्याला एकूण ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार रुपये विमा भरपाई मिळाली. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
11
संबंधित लेख