AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नवीन लागवड केलेल्या सिताफळ बागेचे संगोपन!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
नवीन लागवड केलेल्या सिताफळ बागेचे संगोपन!
➡️ शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांनी सीताफळाची नवीन लागवड केलेली आहे.नवीन लागवड केलेल्या सिताफळ बागेचे संगोपन याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन महिला प्रगतशील शेतकरी स्वप्ना मगर यांच्या द्वारे जाणून घेऊया. ➡️ यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेली आहे जे रोप लावलेले आहे त्याची उंची जर 1 ते 1.5 फूट पर्यंत असेल तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत आहे तसेच वाढू द्यावे कारण तोपर्यंत त्याची उंची 2 ते 2.5 फूट होईल व काडीदेखील मजबूत होईल. ➡️ नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये वातावरण बदलामुळे रोपांची वाढ मंद होते आणि 15 जानेवारी पर्यंत काडी ठेवून छाटणी करता येते हे झाले ज्यांचे रोप लहान आहे. ➡️ तसेच ज्या शेतकऱ्यांनी 2 ते 2.5 फूट उंचीची रोपे घेऊन लागवड जूनमध्ये केली आहे. त्या शेतकऱ्यांनी लागवडीनंतर 1 महिन्यांनी 1.5 फुटावर छाटणी केली पाहिजे म्हणजे एका काडीला दोन नवीन फांद्या फुटतील व त्या ऑक्टोंबर महिन्यापर्यंत 2 ते 2.5 फूट होतील त्यासाठी ड्रिप मधून 19:19:19 एकरी 2 किलो + मॅग्नेशियम सल्फेट एकरी 2 किलो + ह्यूमिक एकरी अर्धा किलो दर 15 दिवसाला द्यावे व दर 40 दिवसाला 100 ग्रॅम डीएपी रिंग पद्धतीने द्यावे. ➡️ महिन्यातून एकदा 0:52:34 एकरी 2 किलो ड्रीप मधून द्यावे, तसेच पोषक मूलद्रव्यांची फवारणी दीड महिन्यातून एकदा घ्यावी म्हणजे ऑक्टोबरपर्यंत छान पद्धतीने फांद्या वाढतील तसे महिन्यातून एकदा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करावी म्हणजे रोग कीड नियंत्रणात राहील. ➡️ फवारणीसाठी - १) मेंटो - इमिडाक्लोप्रिड 70 % प्रमाण - 6 ग्राम / 15 लिटर २) मँडोझ - कार्बेन्डाझीम 12 % + मॅंकोझेब - 63 % प्रमाण - 35 ग्राम / 15 लिटर ३) सुपर सोना - फुलविक ऍसिड 30 % प्रमाण - 15 ग्राम / 15 लिटर 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
6