AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड!
👉राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु.जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड करण्यात आली. अनुसूचित जाती प्रवर्गातील ४१ व अनुसूचित जमाती प्रवर्गातील ४२ लाभार्थ्यांची निवड करून यादी प्रसिद्ध करण्यात आली. 👉राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या निधीतून २०२०-२१ मध्ये अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना अनुक्रमे १ कोटी १० लाख ४४ हजार रुपये व १ कोटी १२ लाख ९५ हजार रुपये नियतव्यय मंजूर केले होते. सोडतीद्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड झाली, त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्पुरत्या स्वरूपात निवड झाल्याबाबत संदेश पाठवून कळविण्यात आले आहे. 👉निवड झालेल्या लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत (ता.२३) मार्गदर्शक सूचनांनुसार नमुद कागदपत्रे महाडिबिटी प्रणालीवर संकेतस्थळ hhttps //mahadbtmahait.gov.in) कागदपत्रे अपलोड करा` या टॅबवर जाऊन अपलोड करणे बंधनकारक आहे. डिजिटल ७/१२ ,डिजिटल ८ अ, जात प्रमाणपत्र, उत्पन्न‍ प्रमाणपत्र, ग्रामसभेचा ठराव, स्वसाक्षांकित केलेले कुटुंब प्रमाणपत्र, अशी एकूण सहा कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. 👉संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखालील प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरून लॉगीन करून आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावीत. पात्र लाभार्थींची निवड अंतिम करण्यात येईल. कामाची पूर्वसंमती देण्यात येईल. अन्यथा, निवड रद्द होणार 👉विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे अपलोड न केल्यास निवड रद्द होऊन प्रतीक्षा यादीतील पुढील लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. ताबडतोब कागदपत्रे अपलोड करून लाभ घ्यावा, अडचण येत असल्यास संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषी ) यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती एल. जी. गायकवाड यांनी केले. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
113
24
इतर लेख