AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नवजात वासराकडे लक्ष द्या
पशुपालनअॅग्रोवन
नवजात वासराकडे लक्ष द्या
नवीन जन्मलेल्या वासरांचे संगोपन योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी चार महिन्यांपर्यंत विशेष लक्ष द्यावे.
• जन्मलेल्या वासराला स्वच्छ कपड्याने किंवा गोणपाटाने पुसून त्याचे वजन करून घ्यावे. तोंडातील व नाकातील घाण हलक्या हाताने काढून टाकावी. • कानात हळूवार फुंकर मारावी. वासराची नाळ शरीरापासून २ ते ३ सेंमी अंतरावर स्वच्छ ब्लेडने कापून दोऱ्याने बांधावी. दोऱ्याने बांधलेल्या भागापासून १ सें.मी. अंतर ठेवावे. नाळेमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून त्यावर आयोडिन लावावे. • वासराला अर्ध्या तासाच्या आत आईचा चीक पाजावा. • वासरांना ओळखणे सोपे जावे यासाठी त्यांना वयाच्या एका आठवड्याच्या आत कानामध्ये टॅग लावावे. • नवीन जन्मलेल्या वासराला पहिल्या आठवड्यात जंतनाशकाची मात्रा द्यावी आणि त्यानंतर २० दिवसांच्या अंतराने ६ महिन्यांकरिता द्यावी. • वासरांचे लाळ्या-खुरकत, घटसर्प, फऱ्या या रोगांवर तज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. • वासरांना स्वच्छ आणि हवेशीर गोठ्यात बांधावे. संदर्भ - अग्रोवन २१-सप्टे-१७
42
3