AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्विपक्षीय व्यापार करारात साखरेचा समावेश करा : इस्मा
कृषि वार्ताअॅग्रोवन
द्विपक्षीय व्यापार करारात साखरेचा समावेश करा : इस्मा
देशात २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षात अतिरिक्त साखर उत्पादन होणार असल्याचे संकेत मिळत आहे. देशांतर्गत साखरेचे उत्पादन वाढल्यास स्थानिक पातळीवर साखरेच्या दरात घसरण होऊ शकते. यामुळे थकीत ऊसबिलाची समस्याही निर्माण होईल, असा दावा करत ‘इस्मा’ने साखर निर्यात वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे.
‘‘सध्या कृषी निर्यात धोरण तयार केले जात आहे. त्यासाठी साखर निर्यात कशी वाढविता येईल, या मुद्द्यावर वाणिज्य मंत्रालयाने मते मागविली आहेत. त्यावर इस्माने भारत आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय व्यापार करारात साखरेचा समावेश करण्याची सूचना केली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बांगलादेशमधील रिफायनरींकडून भारतातील साखरेला प्राधान्य दिले जात आहे. मात्र ब्राझीलमधील स्वस्त साखरेशी आम्ही स्पर्धा करणे अशक्य आहे, असे ‘इस्मा’ने नमूद केले आहे. साखर निर्यातीसाठी हवे योग्य धोरण भारत आणि श्रीलंकादरम्यान मुक्त व्यापार करारामुळे साखर निर्यातीला फायदा होणार असल्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. भारताचा चीन आणि इंडोनेशियाबरोबरचा व्यापार प्रतिकूल स्थितीत आहे. चीन आणि इंडोनेशिया हे जगातील मोठे साखर खरेदीदार देश आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांत साखर निर्यातीसाठी योग्य असे देवघेव धोरण राबविण्याची गरज ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल जागतिक बाजारपेठेत पोचावा यासाठी निर्यातीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे यापूर्वी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. युरोपीय देशांत दहा हजार टन साखर निर्यात होणार यंदाच्या हंगामात भारतातून युरोपीय देशांत दहा हजार टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना विदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे.देशातून साखर निर्यात करण्यासाठी २० टक्के शुल्क लागू आहे. मात्र, युरोपीय देशांत एका विशिष्ट कोट्यातून साखर निर्यात केली जाणार असून त्यावर शुल्क नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, देशात यंदा (२०१७-१८) २४.५-२५.० दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात २०.१७ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते. संदर्भ –अग्रोवन२ऑक्टों१७
5
0