AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्षाचे नवीन वाण विकसित
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
द्राक्षाचे नवीन वाण विकसित
नवी दिल्ली: पुण्यातील डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटने (डीएसटी) अधिक रसदार द्राक्षांचे उत्पादन विकसित केले आहे. डीएसटीच्या स्वायत्त अशा आघारकर संशोधन संस्थेतील (एआरआय) शास्त्रज्ञांनी ही द्राक्षाची संकरित जात विकसित केली आहे. जी बुरशीजन्य संसर्गाला प्रतिबंध करणारी, झुपकेदार आणि उत्तम रसाचा दर्जा असणारी आहे. याचा उपयोग पेय, मनुका, जॅम, रेड वाइन करण्यासाठी करता येणार असून, शेतकरी उत्साहाने या प्रकाराचा अंगिकार करीत आहेत._x000D_ डॉ. सुजाता टेटली, शास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्रज्ञ आणि रोप संकरित गट एसएसीएस-एआरआय, यांनी आवश्यक गुणधर्मांवर काम करून ही द्राक्षाची विशिष्ट एआरआय-516 ही प्रजाती विकसित केली आहे. एआरआय-516 हा बुरशीजन्य संसर्गरोधक हा गुण अमेरिकन जातीचे द्राक्ष असलेल्या काटवा पासून उत्पन्न झाला आहे. यामध्ये उत्तम दर्जाची फलन क्षमता आणि प्रति युनिट उत्पन्न क्षमता आहे. ही संकरित जात लवकर पिकविण्यासाठी मळणीनंतर 110-120 दिवस लागतात. या जातीमध्ये द्राक्षाचे लांबलचक गुच्छ आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये आढळतात. _x000D_ संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, १२ मार्च २०२० _x000D_ _x000D_ ही महत्वपूर्ण लाइक करा व आपल्य शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. _x000D_
48
0
इतर लेख