AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशात साखऱेचे उत्पादन ५ लाख टन
कृषी वार्तालोकमत
देशात साखऱेचे उत्पादन ५ लाख टन
पुणे – देशातील १०० साखर कारखाने सुरू झाले असून, त्यात ४.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच काळात देशभरातील ३१० साखर कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे मागील वर्षापेक्षा देशाचे साखर उत्पादन निम्मेदेखील झालेले नाही. साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील ऊस गाळपाला लांबलेला पाऊस व नुकसानीमुळे २२ नोव्हेंबर पासून सुरूवात झाली आहे. सदयस्थितीत या राज्यातील ६ कारखानेच सुरू झाले आहेत. कर्नाटकातील १८ कारखाने सुरू झाले असून, १.४९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. मागीलवर्षी ५३ कारखान्यांत ३.६० लाख टन साखर उत्पादित झाली होती. त्यातच यंदा आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने साखरेच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत ४५ ते ५० लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशातील ६९ कारखाने सुरू झाले असून, २.९३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. उत्तराखंड व बिहारमधील प्रत्येकी २, हरियाणा १, गुजरात ३ व तामिळनाडूमधील ५ कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी ४९ हजार टन साखर उत्पादित केली आहे. संदर्भ – लोकमत, २६ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
72
0