AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशात ‘लष्करी अळी’ने घातला धुमाकूळ
कृषी वार्ताअॅग्रोवन
देशात ‘लष्करी अळी’ने घातला धुमाकूळ
नवी दिल्ली: देशात खरीप हंगामात ८४ हजार ४८६ हेक्टरवरील मका पिकाचे लष्करी अळीने नुकसान केले आहे. रब्बी हंगामातही या अळीचे संकट कायम असून ऊस आणि ज्वारी पिकांवरही लष्करी अळीने आक्रमण केले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी राज्यसभेत दिली. रुपाला म्हणाले की, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांमध्ये या अळीने धुमाकूळ घातला. कर्नाटकात तर जवळपास ८१ हजार हेक्टरवरील पीक या अळीने फस्त केले आहे. सब-सहारण आफ्रिकेमध्ये मागील वर्षी लष्करी अळीच्या आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात अन्नधान्य तुटवडा निर्माण झाला होता.
जून महिन्यात कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यात शास्त्रज्ञांना ही अळी आढळली होती. येथे मका पिकावर तब्बल ७० टक्के या प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी कृषी मंत्रालयाने राज्य सरकारसोबत पीक सर्व्हे, सल्ला देणे तसेच कीड नियंत्रणासाठी कीडनाशके आणि सामग्रीचे वाटप केले,’’ असेही ते म्हणाले. संदर्भ - अॅग्रोवन, २४ डिसेंबर २०१८
16
0