AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशात यंदा कडधान्य आय़ात ४६% वाढली
कृषि वार्ताअॅग्रोवन
देशात यंदा कडधान्य आय़ात ४६% वाढली
नवी दिल्ली – देशात यंदा कडधान्य उत्पादन घटल्याने आयात ४६ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या काळात २३ लाख टन कडधान्य आयात झाली आहे. मागील हंगामात याच काळात १६ लाख टन आयात झाली होती, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
जगात भारत हा सर्वाधिक कडधान्य आयात करणारा देश आहे. देशात २०१९-२० वर्षात कडधान्य उत्पादन घटल्याने आयात वाढली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या साठयापेक्षा बाजारात कडधान्याला मागणी अधिक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये कडधान्य उत्पादन घटून ८२ लाख टनांवर आले आहे. कडधान्य आयातीत मसूरचा वाटा हा मोठा आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात मसूरची ६ लाख ८८ हजार ८१७ टन आयात झाली होती. मागील हंगामात याच काळात मसूरची आयात १ लाख ५१ हजार ४०३ टन झाली होती. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २१ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
32
0