कृषि वार्ताअॅग्रोवन
देशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड
नवी दिल्ली: मागील आठवडयात दक्षिण व मध्य भारतातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांमध्ये खरीप मक्याच्या लागवडीस मदत झाली. खरीप मक्याखालील क्षेत्र आत्तापर्यंत 7.5 दशलक्ष हेक्टरवर झाले असून मागील वर्षापेक्षा दोन टक्क्यांनी अधिक आहे. तर, संपूर्ण हंगामात आतापर्यंत सर्वसाधारण क्षेत्रा(7.4 दशलक्ष हेक्टर) पेक्षा यंदाची पेरणी क्षेत्र अव्वल ठरली आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब व उत्तर प्रदेशात यावर्षी पेरणी जास्त होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये खरीप मक्क्याची प्रमुख उत्पादकांनीही पेरणी केली आहे. कर्नाटक व तामिळनाडूमधील पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असतानाही शेतकऱ्यांना पिकांना जास्त मोबदल्याची अपेक्षा आहे, असे कृषीशास्त्रज्ञ म्हणाले. संदर्भ – अॅग्रोवन, 31 ऑगस्ट 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
53
0
इतर लेख