AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशात तुरीची लागवड ४५ लाख हेक्टरवर
कृषी वार्ताअॅग्रोवन
देशात तुरीची लागवड ४५ लाख हेक्टरवर
नवी दिल्ली – देशात खरिपाची लागवड पूर्ण झाली आहे. यंदा कडधान्य पेरणीत दोन टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मात्र कडधान्यांमध्ये महत्वाचे पीक असलेल्या तुरीच्या लागवडीत किंचित वाढ झाली आहे. यंदा देशात तुरीची ४५.८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून मिळाली.
देशात मध्य प्रदेश व महाराष्ट्र ही आघाडीची तूर उत्पादक राज्ये आहेत. मात्र पावसाअभावी या राज्यांमध्ये तूर लागवड यंदा कमी झाली आहे. मान्सूनने उशिरा झालेले आगमन व पावसातील मोठी तूट यामुळे लागवड कमी झाली आहे. प्रारंभी पेरणीयोग्य पाऊस नाही व पाऊस आला तेव्हा लागवडीची वेळ निघून गेली. यामुळे दोन्ही राज्यांत क्षेत्र घटले. महाराष्ट्रात लागवड २.२ टक्क्यांनी घटून १२.१ लाख हेक्टरवर झाली, तर मध्य प्रदेशात तूर लागवड तब्बल १९ टक्क्यांनी घटली. येथे यंदा केवळ ५ लाख ६ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, २ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
141
0