AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशात खरीप पेरणी ४१३ लाख हेक्टरवर
कृषि वार्ताAgrostar
देशात खरीप पेरणी ४१३ लाख हेक्टरवर
नवी दिल्ली: मागील आठवडयात देशभरात अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रखडलेल्या खरीप पेरणीला वेग आला असून, आतापर्यंत ४१३ लाख हेक्टर पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पेरणी ९ टक्क्यांनी घसरली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली आहे. देशात मान्सूनच्या सुरूवातीला पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, मागील आठवडयात वायव्य, पूर्व, ईशान्य व मध्य भारतात चांगला पाऊस झाला असल्याने पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत ४१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
29
0
इतर लेख