कृषि वार्ताअॅग्रोवन
देशात आगाप रब्बी कांदा लागणीत वाढ
पुणे – डिसेंबरच्या पहिल्या आठवडयाअखेर प्रमुख उत्पादक राज्यांत 2.7 लाख हेक्टरवर रब्बी कांदा लागणी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून उपलब्ध झाली आहे.
लेट खरीप म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या आवकेच्या लागणींत मात्र घट आहे. लेट खरीपात 98 हजार हेक्टरवर लागणी झाल्या असून, मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांची घट आहे. या लागणीची उत्पादकताही नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे बाधित असून, पर्यायाने जानेवारी व फेब्रुवारीत कांदयाचा पुरवठा नियंत्रित राहण्याची शक्यता दिसते. मार्चपासून आगाप रब्बी कांदयाची आवक वाढत जाईल. वरील आकडेवारीतून क्षेत्रवाढीचा कल दिसत आहे. 2018 मध्ये खरिपात 48 लाख टन तर लेट खरिपात 21 लाख टन असे दोन्ही मिळून 69 लाख टन कांदा उत्पादन मिळाले होते. त्या तुलनेत 2019 मध्ये खरिपात 39 लाख टन तर लेट खरिपात 15 लाख टन असे दोन्ही मिळून 54 लाख टन उत्पादन अनुमानित आहे. म्हणजे 2018 च्या तुलनेत ते 21 टक्क्यांनी घटल्याचे अनुमान आहे. या घटीचे प्रतिबिंब आपण सध्याच्या बाजारभावात पाहतोच आहे. विशेष म्हणजे 2018 च्या तुलनेत 2019 मधील शिल्लक साठाही लक्षणीयरीत्या कमी होता. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, 23 डिसेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
338
0
इतर लेख