कृषि वार्तालोकमत
देशातील साखर कारखान्यांना मिळणार निर्यात कोटा
पुणे: सलग दुसऱ्या वर्षी देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशातून ६० ते ७० लाख टन साखरेची निर्यात होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साखर कारखान्यांना निर्यात कोटा दिला जाणार असून, त्यासाठी विशेष सवलतदेखील देण्यात येणार असल्याची माहिती साखर महासंघाने दिली.
यंदाच्या गाळप हंगामात ३३० लाख टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या हंगामातही असेच उत्पादन झाले होते. देशातील साखरेचा वार्षिक खप अडीचशे लाख टनांच्या आसपास आहे. गतहंगाम व यंदाचा शिल्लक साठा धरून यंदा १ ऑक्टोबर २०१९ ला सुरू होणाऱ्या हंगामाच्या सुरूवातीला १४५ लाख टनांचा साठा शिल्लक असेल. त्यामुळे ६० ते ७० लाख टन साखर देशातून निर्यात होणे गरजेचे आहे. संदर्भ – लोकमत, १३ जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
संबंधित लेख