कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
देशातील लॉकडाउनमुळे गहूच्या शासकीय खरेदीमध्ये होणार उशीर
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने, आता सरकारी खरेदीला उशीर होण्याची शक्यता आहे. चालू रब्बीमध्ये गव्हाचे विक्रमी उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. यात सरकारने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील गहू खरेदी 25 मार्चपूर्वी सुरू होते, तर अद्याप या राज्यात खरेदी सुरू झालेली नाही. हरियाणामध्ये गहू खरेदी 20 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे, तर पंजाब आणि उत्तर प्रदेशात गहू खरेदी 1 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लॉकडाऊनमुळे देशभरातील बाजारपेठा बंद आहेत. आम्ही राज्यशासनाच्या सतत संपर्कात आहोत. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या फीडबॅकनुसार मंडळांमध्ये कामगारांची मोठी कमतरता आहे. लॉकडाऊनमुळे कामगार खेड्यात गेले आहेत, यामुळे गहूच्या सरकारी खरेदीमध्ये उशीर होण्याची शक्यता आहे. संदर्भ – कृषी जागरण, 26 मार्च 2020 ही महत्वपूर्ण माहिती लाइक करा व आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा
308
0
संबंधित लेख