क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताअॅग्रोवन
देशातील खरीप पेरणीच्या क्षेत्रात घट
चालू हंगामात देशात जुलैअखेर 788.52 लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. मागीलवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यंदा 55.68 लाख हेक्टर म्हणजे 6.59 टक्के पेरणीचे क्षेत्र कमी आहे. भाताचे जुलैअखेर देशातील पेरणीचे सरासरी क्षेत्र 266.20 लाख हेक्टर आहे. आतापर्यंत 223.253 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत भाताची पेरणी 42.67 लाख हेक्टरने कमी झाली आहे. हरियाना, जम्मू काश्मीर, नागालॅंड, तेलंगण, गोवा राज्यात भाताचे क्षेत्र सरासरीपेक्षा वाढले आहे. जुलैअखेर सरासरीच्या तुलनेत 10.26 लाख हेक्टरने अन्नधान्याची पेरणी कमी झाली आहे. मध्य प्रदेश, पंजाब, आसाम, झारखंड या राज्यांत अन्नधान्याची पेरणी वाढली आहे. ऊस लागवडीचे क्षेत्र 4.56 लाख हेक्टरने वाढले आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, हरियाना, पंजाब, उत्तराखंडमध्ये ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात ऊस लागवड कमी झाली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ५ ऑगस्ट २०१९
16
0
संबंधित लेख