AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशाचा तब्बल २३ टक्के भाग अजून ही कोरडाच
कृषि वार्तापुढारी
देशाचा तब्बल २३ टक्के भाग अजून ही कोरडाच
पुणे- देशाचा तब्बल २३ टक्के भाग कोरडाच असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशातील ६६ टक्के भागात सरासरीएवढा व ८ टक्के भागात सरासरीपेक्षा जास्त व ३ टक्के भागात अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ७ ऑगस्टदरम्यानची ही आकडेवारी असून, मान्सूनच्या उर्वरित हंगामात पाठ फिरवलेल्या भागाकडे पाऊस न बरसल्यास तूट भरून निघणार नाही, असे दिसून येते. उपविभागांपैकी तब्बल १० उपविभागांमध्ये अल्प पावसाची नोंद झाली आहे, तर २२ उपविभागांमध्ये सरासरीएवढा, ३ उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक व एका उपविभागामध्ये अतिरिक्त पावसाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ५ टक्के कमी पावसाची नोंद झाली असून, मध्य भारतात सरासरीपेक्षा ५ टक्के अधिक, दक्षिण भारतात ७ टक्के कमी, उत्तर-पश्चिम भारतात ८ टक्के कमी व ईशान्य, पूर्व भारतात मिळून तब्बल १३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. संदर्भ – पुढारी, १४ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
65
0
इतर लेख