AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशभर कांदयाच्या किंमतीत वाढ!
कृषि वार्तापुढारी
देशभर कांदयाच्या किंमतीत वाढ!
नवी दिल्ली – राजधानीसह देशाच्या बहुसंख्य राज्यांमध्ये कांदयाचे दर भडकलेले आहेत. किरकोळ बाजारात कांदा 70 ते 80 रूपयांच्या खाली मिळत नसल्याची स्थिती आहे. कांदयाच्या किंमतीत आणखी वाढ होऊ नये, म्हणून केंद्र सरकारकडून व्यापाऱ्यांच्या गोदामांतील कांदयाची साठवण सीमा आखून देण्यावर विचार सुरू आहे. महाराष्ट्रासह प्रमुख कांदा उत्पादक प्रदेशांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा एक परिणाम म्हणून कांदयाच्या बाजारातील पुरवठयात मोठी घट झाली आहे. मागच्या आठवडयात दिल्लीत कांदा 57 रू. किलो होता. मुंबईत 56 रू. किलो, कोलकत्यात 48 रू. किलो तर जम्मूत 60 रू. किलो होता. आठवडा जसजसा वाढत आहे, तसे कांदयाचे दर भडकत गेले व आता ते 70 ते 80 रू. किलोपर्यंत पोहोचले आहेत. पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने काही उपयायोजना केल्या आहेत. तरीही कांदयाचे दर आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकार दर आटोक्यात येत आहेत का, याची दोन ते तीन दिवस वाट बघेल. नंतर जर तसे घडले नाही, तर व्यापाऱ्यांवर साठवण मर्यादा घालण्याचा निर्णय जाहीर करेल व त्यांची अमंलबजावणी करेल. संदर्भ – पुढारी, 23 सप्टेंबर 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
154
0