AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशभरात एकाच क्रमांकावर करावा लागेल LPG कनेक्शनसाठी कॉल!
समाचारNews 18 lokmat
देशभरात एकाच क्रमांकावर करावा लागेल LPG कनेक्शनसाठी कॉल!
➡️ नवीन एलपीजी कनेक्शन मिळवणं किंवा गॅस सिलेंडर रिफिल करणं अनेकदा गोंधळाचं काम ठरतं. डिस्ट्रिब्युटरच्या ऑफिसमध्ये फेऱ्या घातल्यानंतर ही कामं पूर्ण होतात. मात्र आता संपूर्ण देशात एलपीजी गॅस कनेक्शन घेण्यासाठी किंवा एलपीजी सिलेंडर भरण्यासाठी एकच क्रमांक वापरावा लागणार आहे. या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळेल. ही सुविधा सध्या केवळ इंडियन ऑइल कॉरपोरेशन कडून एलपीजी कनेक्शन घेतल्यास मिळते आहे. याकरता तुम्हाला ८४५४९५५५५५ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. रजिस्टर्ड क्रमांकावर तुम्हाला ८४५४९५५५५५ या क्रमांकावर मिस्ड द्यावा लागेल. ➡️ सोमवारपासून मिस्ड कॉल देऊन सिलेंडर भरण्याची आणि नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची सुविधा सुरू केली आहे. देशात कुठेही राहणारी व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात. शिवाय आयओसीने एका सिलेंडरचा प्लॅन दोन सिलेंडर प्लॅनमध्ये बदलण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये ग्राहक १४.२ किलोचा दुसरा सिलेंडर घेऊ इच्छित नसल्यास ते दुसरा सिलेंडर केवळ ५ किलोचा घेऊ शकतात. जानेवारी २०२१ मध्ये केवळ काही शहरात मिस्ड कॉलवर सिलेंडर भरण्याची किंवा नवीन कनेक्शन घेण्याची सुविधा देण्यात आली होती. कशाप्रकारे बुक कराल एलपीजी गॅस सिलेंडर? > तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन 8454955555 या नंबरवर मिस्ड कॉल द्या >भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) च्या माध्यमातून देखील एलपीजी रिफिल करता येईल >इंडियन ऑइल app किंवा https://cx.indianoil.in च्या माध्यमातून देखील बुकिंग करता येईल >ग्राहकांना 7588888824 या क्रमांकावर WhatsApp मेसेच्या माध्यमातून देखील सिंलेंडर भरता येईल >याशिवाय 7718955555 या क्रमांकावर एसएमएस करुन किंवा आयव्हीआरएस करुन बुकिंग करता येईल >Amazon आणि Paytm च्या माध्यमातून देखील सिलेंडर रिफिल किंवा बुक करण्याची प्रक्रिया देण्यात आली आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्युज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
1
इतर लेख