योजना व अनुदानAgrostar
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना!
➡️शेतीनंतर दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागात उत्पन्नाचा उत्तम स्त्रोत मानला जातो. यामुळेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना पशुपालनाशी संबंधित व्यवसाय स्वीकारण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. या संदर्भात केंद्र सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.
➡️तुम्ही जर गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या, उंट आणि मासे इत्यादी पाळीव जनावरे पाळणारे असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही अजून किसान क्रेडिट कार्ड बनवले नसेल, तर ते लगेच बनवा. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच जनावरे पाळणाऱ्यांसाठीही किसान क्रेडिट कार्ड बनवले जात आहेत. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय हे कार्ड पशुपालकांसाठी बनवत आहे.
➡️31 डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित टीम घरोघरी जाऊन के.सी.सी. तयार करणार आहे. जर टीम तुमच्या दारात येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेतही जाऊ शकता. यासाठी बँकेत अर्ज उपलब्ध होईल. फॉर्म भरा आणि तिथे सबमिट करा. केवायसीसाठी काही महत्त्वाची कागदपत्रेही सादर करावी लागतील.
➡️जर बँक तुमच्या घरापासून दूर असेल तर तुम्ही सी.एस.सी केंद्राला भेट देऊन हा फॉर्म ऑनलाइन देखील भरू शकता. फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर, फॉर्मसह सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाईल. जर तुमची कागदपत्रे बरोबर आढळली आणि तुम्ही खरोखरच पशुपालक आहात हे तपासात मान्य केले गेले तर तुम्हाला ३० दिवसांच्या आत के.सी.सी. मिळेल.
➡️संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.