योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
दूध अनुदानासाठी ठराविकच शेतकरी पात्र!
➡️दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती, मात्र त्याबाबतचा जीआर काढण्यात न आल्याने राज्य सरकारची मोठी गोची झाली होती. गेले दोन ते तीन दिवस दूध अनुदानाचा मुद्दा चांगलाच तापल्याने सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेत, त्यास अखेर मंजुरी दिली आहे.
➡️दूध अनुदान योजनेसाठी राज्य सरकारने अटी शर्थीचा घोळ कायम ठेवला असून, दूध अनुदान देण्यासाठी सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना थेट मदत हस्तांतरण योजनेद्वारे अनुदानाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.परंतु त्यातही अनुदानासाठी कोण होणार पात्र आणि कोण होणार अपात्र हे कसे जाणून घायचे व्हिडिओ मध्ये पहा.
➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.