पशुपालनअॅग्रोवन
दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहार
जनावरांना शरीर वाढीसाठी आणि दुग्धोत्पादनासाठी विविध अन्न घटकांची गरज असते. जनावरांचे प्रकार, वय, दुग्धोत्पादन तसेच गाभण काळ यानुसार उपलब्ध चारा आणि पशुखाद्य यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करून आवश्यक अन्नघटक कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देणे म्हणजे संतुलित आहार देणे होय.
संतुलित आहाराचे फायदे • उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर होऊन, प्रतिलिटर दूध उत्पादनाचा खर्च कमी होतो. • दूध उत्पादन व त्यातील फॅट, एस.एन.एफ. मध्ये वाढ होते. • जनावरांच्या शरीराची वाढ व एकूणच आरोग्य उत्तम राहते. • गाई म्हशीची प्रजनन क्षमता सुधारते. • वेतातील अंतर कमी होऊन प्रतिवर्षी एक वासरू ही संकल्पना साध्य करता येते. • वासरांची योग्य वाढ होऊन लवकर वयात येण्यास मदत होते. संदर्भ – अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
585
0
संबंधित लेख