AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दुभत्या जनावरांसाठी पाणी व्यवस्थापन
पशुपालनअॅग्रोवन
दुभत्या जनावरांसाठी पाणी व्यवस्थापन
१) दुभत्या जनावरांना नेहमी स्वच्छ, ताजे पाणी पिण्यास द्यावे. ते मुबलक प्रमाणात असावे. पाण्याचे तापमान खूप कमी किंवा जास्त नसावे. पाण्याचे तापमान १६ ते २६ अंश सेल्सिअस असावे. दिवसातून कमीत कमी तीन वेळेस पाणी पाजावे. २) उन्हाळ्यात दुभत्या जनावरांना पाणी दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चारवेळा दिल्यास जनावरे १५ ते २० टक्के अधिक दूध देतात. गायी-म्हशींना पाणी कमी पाजल्यास त्यांची दुग्धोत्पादन क्षमता असतानाही घट येते. ३) जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असल्यास जनावरे कमी पाणी पितात. कारण, हिरव्या चाऱ्यामार्फत त्यांची पाण्याची गरज काही प्रमाणात भागविली जाते. हिरव्या चाऱ्यामध्ये ६५ ते ८५ टक्के पाणी असते. १५ ते ३५ टक्के शुष्क भाग असतो. मात्र, उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, त्यामुळे अशा काळात जनावरे सुका चारा जास्त प्रमाणात खातात आणि त्यामुळे त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. सुक्‍या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण फक्त १० ते १५ टक्के एवढे असते. एक किलो शुष्क खाद्य पचविण्यासाठी ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ४) कळपात नवीन आणलेली जनावरे शक्‍यतो पाण्यातील बदलामुळे पाणी कमी पितात अशावेळी पाण्यात थोडा गूळ मिसळून पाजावे म्हणजे नवीन जनावरे पाणी आवडीने पितात.
५) गाय व म्हैस दिवसाला साधारण ४५ ते ६० लिटर पाणी पिते.शेळ्या, मेंढ्या प्रतिदिवस ४ ते ६ लिटर पाणी पितात. कोंबड्या प्रतिदिन २०० ते २५० मिलि पाणी पितात._x005F_x000D_ ६) एक लिटर दूध निर्माण करण्यासाठी ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे._x005F_x000D_ _x005F_x000D_ संदर्भ – अॅग्रोवन _x005F_x000D_ _x005F_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
559
0
इतर लेख