AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दुधाळ गाईची निवड करताना कोणत्‍या गोष्‍टी विचारात घ्‍याव्‍यात!
पशुपालनअ‍ॅग्रोवन
दुधाळ गाईची निवड करताना कोणत्‍या गोष्‍टी विचारात घ्‍याव्‍यात!
• दुधाळ गाईची निवड करताना तिचं बाह्यस्वरूप, दुधुत्पादन आणि प्रजननक्षमता विचारात घ्यावी. • गाय विकत घेताना अगर निवडताना तिचे दुध २-३ वेळा काढून उत्पादनाची खात्री करून घ्यावी. केवन मोठया आकाराची कास याबाबतीत गृहीत धरू नये. • गाईला पान्हावयास किती वेळ लागतो? टी आंबोणशिवाय धार देते का? किंवा नाही? तिला ठराविक गवळ्याची सवय आहे का? या गोष्टींचीही खात्री करून घ्यावी. • तापट स्वभावाच्या गाई, उत्तेजित झाल्या, कि पान्हा चोरतात म्हणून शांत स्वभावाची गाय निवडावी. • धारेच्या वेळी लाथा मारणारी, चीर्गुत, दगड आणि विटा चघळण्याची सवय असणारी गाय घेणं टाळाव. • धरेला (पिळण्यासाठी) हलकी असणारी गाय निवडावी. जड गायी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळं दूधही कमी निघते. धार काढून पाहताना चारही सडातील दुध काढून पाहावं. • गाय विकत घेताना शक्यतो दुसऱ्या वेतातील गाय निवडावी. • जातिवंत दुधाळ गाई तरतरीत आणि निरोगी दिसतात. • त्यांचे डोळे पाणीदार असतात. • सर्व अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असते. • शरीराचा आकार वरून, पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केलं असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसतो. • गाईकड पुढून पाहिलं असता दोन पायातलं अंतर अधिक असाव. कास भरदार असावी. वरून पाहिलं असता कमरेची हाडं दूरवर असावीत. • बाजूनं पाहिलं असता शेपटीवरील दोन हाडं आणि कास यामध्ये अधिक अंतर असावं. गाय लठ्ठ नसावी. • लांब आणि सडपातळ असावी. • पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा. • पाठीला बक असणाऱ्या गाई शक्यतो टाळाव्यात. • गाईंच्या खुरांचा रंग काला असावा. • वाढलेल्या नख्या किंवा खुरसडा याबाबतीत बारकाईने चौकसपणे बघावं. • गाय विकत घेताना टी चालवून- फिरवून पहावी. • कास हा दुभत्या जनावरांचा महत्वाचा अवयव. कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी. धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठी दिसते. सड फुगलेले दिसतात. दुध काढल्यानंतर कासेच आकार पूर्ववत लहान होणारा असावा. त्वचा मऊ असावी. • कासेवर अनेक फाटे असणारं शिरांच जाळ असावं. शिरा जड असाव्यात. चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत. • ज्या वेळी गाईची दुध उत्पादनाची, प्रजननक्षमतेची आणि वंशावळीची माहिती खात्रीशीरपणे उपलब्ध होते, त्याचवेळी या माहितीच्या आधारे आणि आताच सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे गाय विकत घेतान तिची निवड करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
10