AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 'इतकी' सबसिडी !
पशुपालनAgrostar
दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 'इतकी' सबसिडी !
🐄सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. सरकार पशुपालन करण्यासाठी 33% अनुदान देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. 🐄दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्यात येतात. व्यावसायिक स्तरावर दूध हाताळण्यासाठी नवीन तंत्रे आणणे आणि स्वयंरोजगार निर्माण करणे आणि असंघटित क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट राहणार आहे. परंतु या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. 🐄लाभार्थी कोण असतील : शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपन्या, संघटित आणि असंघटित क्षेत्रातील गट, संघटित क्षेत्रातील गटांमधील स्वयं-सहाय्यता गट (SHG), दुग्ध सहकारी संस्था, दूध संघ, दूध संघ या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराला या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा दिल्या जातील. कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र योजनेतील अटींचे पालन करावे लागेल. 🐄इतकी दिली जाते सबसिडी : सर्वसाधारण श्रेणीसाठी डेअरी युनिटच्या खर्चाच्या 25% आणि SC/ST शेतकऱ्यांसाठी 33% अनुदान नाबार्डकडून दिले जाईल. याशिवाय डेअरी फार्म उभारणीसाठी लागणार्‍या खर्चाच्या 10 टक्के रक्कम सरकार कर्ज म्हणून देणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता 🐄संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
14
इतर लेख