नोकरीTV9 Marathi
दहावी पास तरुणांना मोठी संधी, रेल्वेमध्ये मेगाभरती!
➡️ दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी शेकडो पदांसाठी रिक्त पदे जारी केली आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ३३९ अपरेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या जागा १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत. १० वी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांची ही एक उत्तम संधी आहे. पदांची नावं 1)वेल्डर 2)सुतार 3)फिटर 4)इलेक्ट्रीशियन 5)स्टेनो 6)वायरमन 7)इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 8)मेकॅनिक डिझेल ➡️ पात्रता दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेड/क्षेत्रातील ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. ➡️ वयोमर्यादा उमेदवारांचे वय १५ वर्षे ते २४ वर्षे दरम्यान असावे. ➡️ निवडप्रक्रिया कशी ? 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. ➡️ अर्ज कसा करावा? इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईट apprenticeship.org पर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. अपरेंटिसच्या एकूण ३३९पदांची भरती केली जाईल. यासाठी, अर्ज करण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबरपासून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट secr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतील. निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाईल आणि प्रत्येक ट्रेडसाठी 1 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण दिले जाईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
44
इतर लेख