AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी!
नोकरीमहाराष्ट्र टाइम्स
दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी!
➡️भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ➡️भारतीय कृषी संशोधन संस्थेने परिषद आणि त्याच्या विविध प्रादेशिक केंद्रांमध्ये तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार तंत्रज्ञांच्या एकूण ६४१ पदांची भरती करण्यात येणार आहे. पात्रता ➡️ICAR-IARI ने जाहीर केलेल्या तंत्रज्ञ भरतीच्या जाहिरातीनुसार, या पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण किंवा इतर कोणतीही समकक्ष पात्रता असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा ➡️उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया ➡️ICAR मधील तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट nbri.res.in वर जाऊन अर्ज करु शतात. यासाठी अर्ज प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरु होणार असून उमेदवार १० जानेवारी २०२२ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान, उमेदवारांना IARI ने निर्धारित केल्यानुसार १०० रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. जे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून भरू शकतात. संदर्भ:-महाराष्ट्र टाइम्स . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
70
18