AgroStar
दर महिन्याला 28 रुपये जमा करुन मिळेल 4 लाखांचा फायदा!
समाचारNews 18 lokmat
दर महिन्याला 28 रुपये जमा करुन मिळेल 4 लाखांचा फायदा!
➡️बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देत आहे. अनेक ग्राहकांना याबाबत माहिती नसते. दर महिन्याला केवळ २८.५ रुपये जमा करुन ४ लाख रुपयांचा फायदा घेता येईल. काय आहे ही सुविधा - ➡️४ लाखांचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. ही योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आहे. या स्किममध्ये गुंतवणूक करण्यासाठीची रक्कम अतिशय कमी आहे. या दोन्ही स्किममध्ये मिळून वर्षाला ३४२ रुपये म्हणजेच दर महिन्याला २८ रुपये जमा करावे लागतात. केवळ ३३० रुपयांच्या वार्षिक रकमेवर २ लाखांचा फायदा ➡️पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम ३३० रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला लाइफ कव्हर मिळतो. जर विमाधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना २ लाख रुपये मिळतात. ही रक्कम बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना - ➡️पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अतिशय कमी प्रीमियममध्ये जीवन विमा देते. केंद्र सरकारकडून PMSBY एक अशी स्किम आहे, ज्याअंतर्गत केवळ १२ रुपयांत खातेधारकाला २ लाक रुपयांचा इन्शुरन्स कव्हर मिळतो. ➡️बँकेकडून जनधन खातेधारकांना ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा अॅक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरची सुविधा देते. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
3
इतर लेख