सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान.
➡️कांदा उत्पादनासाठी पाणी आणि खताचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. रब्बी हंगामामध्ये बऱ्यावेळा पाण्याचा तुटवडा असतो. ➡️अशावेळी पाणी व खताचे व्यवस्थापन ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने दोन्ही निविष्ठांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के वाढते. परिणामी कांद्याच्या उत्पादनातही वाढ होते. सिंचनासोबत पाण्यात विरघळणारी खतांचा अवलंब करताना- ➡️गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल ६० सें.मी. अंतरावर ओढून घ्याव्यात. लॅटरलला ३० ते ४० सें.मी. अंतरावर ड्रीपर्स असावेत. ➡️फर्टिगेशनसाठी विद्राव्य खतांच्या मात्रा ठरविण्यापूर्वी मातीचे परीक्षण करणे आवश्यक आहे. ➡️जमिनीचा सामु, विद्युत वाहकता, जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घेऊन विद्राव्य खतांचे नियोजन करावे. ➡️चांगल्या उत्पादनासाठी लागवडीच्या ६० दिवसां;पर्यंत ठिबकमधून द्यावे. कांदा पीक लागवडीनंतर ६० दिवस खतांना चांगला प्रतिसाद देते. ➡️जस्त, लोह व मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा फवारणी किंवा ठिबक सिंचनातून गरजेनुसार करता येतो. ➡️सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली विद्राव्य खते १९:१९:१९, २०:२०:२०, ११:४२:११, १६:०८:२४, १५:१५:३० अशा नत्र, स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्य ठिबक द्वारे द्यावे. फर्टिगेशन तंत्रज्ञानाचे फायदे - ➡️विद्राव्य खते ठिबक सिंचनासोबत थेट मुळांच्या कक्षेत दिली जातात. त्यामुळे त्वरित उपलब्ध होतात. निर्यातक्षम गुणवत्तेचे उत्पादन मिळते. ➡️पिकांना पाणी आणि अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. ➡️पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार पाणी आणि खताचे योग्य नियोजन शक्य होते. ➡️वेळ, मजूर, खर्च, ऊर्जा, यंत्रसामग्रीची बचत होते. ➡️हलक्या जमिनीतही फर्टिगेशन तंत्राच्या मदतीने अधिक उत्पादन मिळविणे शक्य होते. ➡️जमिनीत सतत वाफसा राहतो. परिणामी जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे कांद्यांची काढणी सोपी होते. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
44
10