AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 दरवर्षी 6000 रुपये हवे असतील तर अजिबात करू नका या चुका!
कृषी वार्तान्यूज १८ लोकमत
दरवर्षी 6000 रुपये हवे असतील तर अजिबात करू नका या चुका!
➡️ केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला ६००० रुपये पाठवण्यात येतात. २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवले जातात. दरम्यान काही शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे मात्र त्यांना या योजनेचा फायदा मात्र अद्याप मिळालेला नाही. शेतकरी करतात या चुका ➡️ शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांना या योजनेचे २००० रुपये मिळत नाही. कारण योजनेच्या अटीनुसार त्यांनी याकरता अर्ज भरलेला नसतो. योजनेच्या अर्जामध्ये तुमचं नाव ENGLISH मध्ये असणं आवश्यक आहे. अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरताना त्यांचे नाव मराठीत किंवा अन्य भाषेत लिहिलं आहे त्यांनी यामध्ये सुधारणा करून घ्यावी. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. ➡️ याशिवाय पीएम किसानच्या योजना अर्जावरील नाव आणि तुमच्या ज्या खात्यात पैसे येणार आहेत त्यामधील नाव वेगवेगळं असल्यास हे पैसे अडकू शकतात. अशावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे नाव आधारवरील नावाप्रमाणे बँक खातं आणि अर्जामध्ये नमुद करणं आवश्यक आहे. अशाप्रकारे ऑनलाइन सुधारा तुमच्या चुका 1) सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जाऊन क्लिक करा. 2) त्याठिकाणी आधार एडिटची एक लिंक दिसेल, त्याठिकाणी Edit Aadhaar Details तुम्हाला क्लिक करावं लागेल. 3) त्यानंतर जे पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दुरुस्त करू शकता 4) तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करावं लागेल 5) नावात चूक असेल तर ती देखील ऑनलाइन तपासू शकता. 6) खातेक्रमांक चुकीचा असेल तर तो देखील सुधारू शकता 7) शिवाय तुम्ही कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी देखील संपर्क करू शकता. 8)Helpdesk ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर ज्या काही चुका आहेत त्या सुधारू शकता. तक्रारीसाठी या क्रमांकावर करा संपर्क पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्कवर - ई-मेल (Email) pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
5
इतर लेख