AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दररोज 416 रुपयांची गुंतवणूक करुन मिळवू शकता 1 कोटी!
समाचारNews 18 lokmat
दररोज 416 रुपयांची गुंतवणूक करुन मिळवू शकता 1 कोटी!
➡️ कोरोना काळात सेव्हिंगबाबत अधिक जागरुकता निर्माण झाली आहे. दर महिन्याला, दर दिवसाला केलेली छोटी गुंतवणूक काही वर्षात मोठी रक्कम तयार होते. अनेक जण कमी गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळणाऱ्या बचत योजनांच्या शोधात असतात. एक अशी बचत योजना आहे, ज्यात कमी गुंतवणूक करुन कोट्यवधींचा फंड तयार करता येतो. पब्लिक प्रॉविडेंट फंड ही योजना त्यापैकीच एक स्मॉल सेव्हिंग स्किम आहे. तसंच यात कोणतीही जोखिमही राहत नाही. ➡️ केंद्र सरकारने सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात कोणतेही बदल केलेले नाही. अर्थ मंत्रालयाने इकोनॉमिक अफेयर्स डिपार्टमेंटला दिलेल्या माहितीनुसार, 2020-21 च्या दुसऱ्या तिमाही म्हणजेच 1 जुलै ते 30 सप्टेंबर कालावधीत विविध स्मॉल सेव्हिंग स्किमच्या व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं सांगितलं. सध्या पब्लिक प्रॉविडेंट फंड खात्यात 7.1 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. पब्लिक प्रॉविडेंट फंड खाते 15 वर्षांनंतर मॅच्युअर होतं. यात दर 5 वर्षांनी वाढ करता येते. कसे मिळतील 1 कोटी रुपये? ➡️ जर तुम्ही एका वर्षात जवळपास 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल, म्हणजेच महिन्याला 12,500 रुपये गुंतवत असाल, तर तुम्ही ही रक्कम 1 कोटी रुपयांत बदलू शकता. सध्या सरकार PPF खात्यावर 7.1 टक्के वार्षिक व्याज देते. या योजनेत गुंतवणूक कमीत-कमी 15 वर्षासाठी केली जाते. जर तुम्ही 15 वर्ष दर महिन्याला 12,500 रुपयांची गुंतवणूक करत असाल, तर ही रक्कम मॅच्युरिटीवेळी 40,68,209 रुपये होईल. एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये आणि व्याज 18,18,209 रुपये होईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्युज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
5
इतर लेख