AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाखांचा फंड!
योजना व अनुदानन्यूज १८ लोकमत
दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाखांचा फंड!
➡️जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर चांगला परतावा तर मिळतोच पण अशी गुंतवणूक केल्यास जोखीमही कमी असते. भारतीय आयुर्विमा महामंडळ ने अशीच एक विशेष योजना आणली आहे, ज्याचे नाव आहे LIC जीवन प्रगती योजना. ➡️ही योजना अशा लोकांसाठी आहे जे जोखीम असल्यामुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात. ➡️एलआयसीच्या या प्लॅनमध्ये पैसे गुंतवून तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी चांगला परतावा मिळवू शकता. ही योजना खरेदी केल्यावर बचत आणि सुरक्षितता दोन्हीची हमी दिली जाते. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीतर्फे दिली जाणारी ही योजना गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरू शकते. २० वर्षापर्यंत करावी लागणार गुंतवणूक ➡️एलआयसीच्या या योजनेत दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. तुम्हाला यात दरदिवशी २०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. सलग २० वर्षे गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवर तुम्हाला २८ लाखांचा फंड एकरकमी मिळेल. हा निधी तुम्ही भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. जीवन विम्यासह डेथ बेनिफिटची सुविधा ➡️LIC जीवन प्रगती योजनेत जीवन विम्यासह रिस्क कव्हर देखील मिळेल. याशिवाय जर नियमित प्रीमियम भरल्यास डेथ बेनिफिटची सुविधाही मिळते. दर पाच वर्षांनी यामध्ये वाढ होते. म्हणजे आधी जेवढे पैसे मिळणार आहे, त्यात नंतरच्या पाच वर्षांमध्ये वाढ झालेली असते. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
6