AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दरमाह 28 रुपयात मिळणार 4 लाखांचा फायदा!
समाचारन्यूज १८लोकमत
दरमाह 28 रुपयात मिळणार 4 लाखांचा फायदा!
➡️अनेक सरकारी योजना असतात पण त्याबद्दल सर्वसामन्यांना माहिती नसते. अशा काही योजना आहेत त्याबद्दल आज माहिती घेऊया. जर तुमचं सरकारी बँकेत खातं असेल तर तुम्हाला याचा फायदा होईल. वास्तविक, बँक आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देत असतात, मात्र त्यांची सर्वांना माहिती नसते. ➡️सरकारी बँकेत तुमचं खातं दरमहा फक्त २८.५ रुपये जमा करून पूर्ण ४ लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. काय आहे 4 लाख रुपयांची ही सुविधा ➡️४ लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीची रक्कम खूप कमी आहे. या दोन योजनांमध्ये फक्त ३४२ रुपये वार्षिक जमा करावे लागतात. ➡️फक्त ३३० रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मार्फत २लाखांचा लाभ मिळतो.या योजनेअंतर्गत व्यक्तीला जीवन विमा संरक्षण मिळते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ➡️प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अत्यंत कमी प्रीमियमवर विमा पुरवते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत खातेधारकाला फक्त १२ रुपयांमध्ये २ ​लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
9
इतर लेख