AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दरमहा २५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील २ लाख, जाणून घ्या कसे?
कृषी वार्ताकृषी जागरण
दरमहा २५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील २ लाख, जाणून घ्या कसे?
➡️सध्याच्या जगात प्रत्येकाला लवकर पैसे कमवायचे असतात. कधी-कधी व्यवसायात ते शक्यसुद्धा होतं. पण नोकरी करणाऱ्यांना हे शक्य नाही. त्यांचं उत्पन्न आणि खर्च निश्चित असल्यामुळे ठराविक वेळेतच पैसे मिळतात. अशात पैसे कमावण्यासाठी एका उत्तम संधीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ➡️आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चांगलं प्लॅनिंग केलं तर तुम्हीही लवकर पैसे कमावू शकता. कारण कमी गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात पैसे जमावण्याची एक चांगली संधी आहे. ➡️गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्टपणे समजून घ्या असे म्हणतात की, एखाद्याने दुसर्‍याकडे पाहून पैशांची बचत करण्यास शिकले पाहिजे. पण गुंतवणूक नेहमीच तुमच्या बजेटनुसार करावी. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी, त्याच्याशी संबंधित सर्व बाबींबद्दल समजून घेणे आवश्यक असते. आपण उदाहरण म्हणून कुठे गुंतवणूक करत आहात?, आपले वय किती? आणि मिळणारा परतावा मोठा असेल की नाही?, वर्षानुवर्षे उत्पन्न वाढणार असेल तर मग ती रक्कम कुठे गुंतवायची. ➡️कशी कराल गुंतवणूक? समजा तुम्हाला 25000 रुपये पगार येतो. यामधून तुम्ही महिन्याला 2500 रुपयांची बचत करू शकता. जर तुम्हाला हे करणं शक्य झालं तर कमी दिवसांत मोठी रक्कम तुम्ही जमवू शकता. ➡️ही खास योजना एसआयपी गुंतवणुकीमध्ये आहे. यातून तुम्ही कुठल्याही जोखमीशिवाय आपल्या कुटुंबासाठी मोठा निधी जमा करू शकता. ➡️कसे मिळणार दोन लाख रुपये? 25 हजार रुपये पगार असणारा व्यक्ती दरमहा एसआयपीमध्ये 2500 रुपयांची गुंतवणूक करू शकतो. यामध्ये पाच वर्षानंतर ही रक्कमही 15 टक्के परताव्यानुसार सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत जाते. ➡️गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित केले पाहिजे नवीन गुंतवणूकदारास प्रथम उत्पन्न आणि खर्चामधील ताळमेळ बसवणं आवश्यक आहे. घर खर्च किंवा इतर खर्च सोडून एका महिन्यात किती पैसे शिल्लक राहतात, याचं हिशेब ठेवावा लागेल. उत्पन्नातून खर्च बाजूला काढल्यानंतर उर्वरित रकमेचा भाग गुंतवता येऊ शकतो. आपण एका महिन्यात मोठी रक्कम गुंतवाल आणि पण नंतर दुसर्‍या महिन्यात गुंतवणुकीबद्दल विचार करत बसाल. म्हणूनच गुंतवणुकीचे लक्ष्य स्पष्ट असणे आवश्यक असते. यासाठी तुम्हाला दरमहा गुंतवणूक सुरूच ठेवावी लागेल. (टीप – कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी, तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
65
7
इतर लेख